छत्रपती संभाजीनगरच्या पशुपालकांसाठी विविध योजना; लाभ घेण्याचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत सन २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश असून, ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नमूद विविध योजना राबविण्यात येत आहेत. पशुपालकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.

अशी आहे योजना
५० टक्के अनुदानावर उच्च उत्पादन क्षमता असलेली  १ गाय/म्हैस वाटप.
७५ टक्के अनुदानावार उच्च उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप.
२५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य वाटप.
२५ टक्के अनुदानावर  फॅट  fat व snf वर्धक खाद्य पुरवठा.
५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी  यंत्र वाटप.
१०० टक्के अनुदानावर बहुवार्षिक चार पीके/ ठोंबे वाटप.
२५ टक्के अनुदानावर मुरघास वाटप.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com  या संकेतस्थळावर भेट देऊन online पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, छपत्रती संभाजीनगर यांनी केले आहे. तसेच योजनासंबंधी अधिक माहितीकरिता डॉ. संजीव पाटील, जिल्हा प्रकल्प अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना 9975269831 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा,असेही कळविण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software