- News
- एक्सक्लुझिव्ह
- २ साहसी कुत्र्यांची कहानी...शेतात बिबट्या तरुणावर हल्ला करण्याआधी २ पाळीव कुत्र्यांनी त्याला ललकारले...
२ साहसी कुत्र्यांची कहानी...शेतात बिबट्या तरुणावर हल्ला करण्याआधी २ पाळीव कुत्र्यांनी त्याला ललकारले... जोरदार झुंज! एका कुत्र्याचा मृत्यू, दुसरा जखमी, असे वाचले तरुणाचे प्राण, सिल्लोड तालुक्याची आहे घटना...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिबट्या तरुणावर झडप घालणार असल्याचे पाहून दोन पाळीव कुत्र्यांनी भुंकून आधी बिबट्याचे लक्ष आपल्याकडे वळवले आणि त्वेषाने हल्ला केला. बिबट्या आणि दोन कुत्र्यांची झुंज सुरू झाली. तरुणाने घाबरून आरडाओरड सुरू केली. त्यामुळे बिबट्याने एका कुत्र्याला जखमी करत दुसऱ्या कुत्र्याला झाडावर घेऊन गेला. यात कुत्रा झाडावरून विहिरीत पडला आणि मृत्यूमुखी पडला. त्यानंतर बिबट्याने पळ काढला... हा थरार प्रसंग सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव शिवारात शनिवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी घडला.
गंगापूर तालुक्यातील वाळूजजवळील मांडवा शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी शेतात आलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने पळून गेला. संदीप पुरुषोत्तम विधाते (वय ३८, रा. तांदूळवाडी मांडवा, शिंदे वस्ती) असे हल्ला झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी घडली. या भागात २ महिन्यांपासून मादी बिबट्या आणि तिच्या दोन बछड्यांचा वावर आहे. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

