- News
- एंटरटेनमेंट
- तनुश्री दत्ताने पुन्हा काढला राग! विवेक अग्निहोत्री अन् नाना पाटेकरांवर टीकास्त्र, हे दोघे मुलगी बघ...
तनुश्री दत्ताने पुन्हा काढला राग! विवेक अग्निहोत्री अन् नाना पाटेकरांवर टीकास्त्र, हे दोघे मुलगी बघितली नाही की...
"आशिक बनाया आपने’ चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ताने मी टू चळवळीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने "चॉकलेट’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही वाईट असल्याचे म्हटले होते. आता, अलिकडच्याच एका मुलाखतीत, तिने पुन्हा दोघांवर शरसंधान साधले असून, संताप व्यक्त केला आहे.
तनुश्री म्हणाली, की काही पुरुषांना महिलांशी कसे वागायचे हे माहीत नाही. मला कधीही प्रतिष्ठित व्यक्तींकडून कोणती समस्या आली नाही. मला असे लोक आवडतात जे प्रोफेशनल असतात आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात. काही लोक मुलगी बघितली नाही की लगेच वाहून जातात, मुलगी दिसली नाही की लगेच त्यांचा इगो जागरूक होतो. ते स्वतःला हिरो दाखवण्याचा प्रयत्न करतात. तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकीला तुमच्याशी शारीरिकदृष्ट्या जवळीक साधायला आवडलेच असे नाही. मी म्हणत नाही की मी संत आहे. मला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्या जवळ जाईल. तशी ती माझी इच्छा असेल. तुम्ही एक अभिनेता आहात. तुम्ही माझ्यासोबत अभिनय करत आहात, हे लक्षात ठेवायला हवे, असे तनुश्री म्हणाली.
नाना पाटेकर निरुपयोगी अभिनेता...
नाना पाटेकर यांच्याबद्दलही तनुश्रीने भाष्य केले. तिने डिंपल कपाडियाच्या त्या मुलाखतीचा उल्लेख केला, ज्यामध्ये तिने नानाला ‘बेहूदा’ म्हटले होते. डिंपल कपाडियासुद्धा त्याच्याबद्दल बोलली आहे, असे तनुश्री म्हणाली. बॉलीवूड अशी जागा आहे जिथे कोणीही विनाकारण लोकप्रिय होऊ शकते. २००८ मध्ये, जेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा त्याचे कोणतेही चित्रपट नव्हते. माझी गाणी हिट झाली होती आणि मी सतत बातम्यांमध्ये असे, असे ती म्हणाली. त्याने माझ्यावर प्रसिद्धी स्टंट केल्याचा आरोप केला. मी आधीच खूप प्रसिद्ध होते. मला एका बेरोजगार, वयस्कर अभिनेत्याकडून प्रसिद्धीची गरज का होती?, असा सवाल तिने केला. बॉलिवूडमधील सर्व जुने लोक धूर्त आणि दुष्ट मनाचे आहेत. ते २० वर्षांपासून हा खेळ खेळत आहेत. तेव्हा मी निर्दोष होते. मला कल्पनाही नव्हती की लोक इतके धूर्त असू शकतात.

अमिताभ बच्चन, शाहरुख खानचा उल्लेख
तनुश्री म्हणाली, की मला त्याच्यासारख्या (नाना) म्हाताऱ्या, बेरोजगार आणि कुरूप माणसाशी लोकांसमोर भांडण्याची गरज आहे का? जेव्हा मी इतकी लोकप्रिय होते. मिस इंडिया, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया युनिव्हर्स.... आशिक बनाया आपने तेव्हाच माझा रिलिज झाला होता. मला आणखी पब्लिसिटीची काय गरज होती? अमिताभ बच्चन, शाहरुख सारखे स्वच्छ प्रतिमा असलेले मोठे अभिनेते आहेत. त्यांच्याशी वाद केला असता ना, अजून पण बरेच मोठे अभिनेते होते वाद घालायला जरा मला प्रसिद्धीच हवी होती. २००८ मध्ये सर्व दिग्ददर्शक त्याच्यासोबत काम करायला घाबरत होते, त्याला काम मिळत नव्हते. त्याची अशी अवस्था असताना त्याच्यासोबत मी प्रसिद्धीसाठी वाद करावा का?, असा सवाल तनुश्रीने केला.

