८ वर्षांनी अभिनेत्रीला झाली मुलगी, नाव ठेवले खूपच खास!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

अभिनेत्री डिंपल झांगियानी लग्नानंतर आठ वर्षांनी आई झाली असून, तिने १ फेब्रुवारीला मुलीला जन्म दिल्यानंतर आता तिचे नावही ठेवले आहे. शिवोना असे नाव ठेवले असून, हे नाव भगवान शंकरापासून प्रेरित आहे. आम्ही सगळे शिवभक्त आहोत आणि शिवोना हे नाव कॉमन नाही, असे डिंपल म्हणाली. डिंपलने डिसेंबर २०१६ मध्ये हिरे व्यापारी सनी असरानी यांच्याशी लग्न केलं […]

अभिनेत्री डिंपल झांगियानी लग्नानंतर आठ वर्षांनी आई झाली असून, तिने १ फेब्रुवारीला मुलीला जन्म दिल्यानंतर आता तिचे नावही ठेवले आहे. शिवोना असे नाव ठेवले असून, हे नाव भगवान शंकरापासून प्रेरित आहे. आम्ही सगळे शिवभक्त आहोत आणि शिवोना हे नाव कॉमन नाही, असे डिंपल म्हणाली.

डिंपलने डिसेंबर २०१६ मध्ये हिरे व्यापारी सनी असरानी यांच्याशी लग्न केलं होतं. डिंपल म्हणाली, की आम्हाला वाटलं की मुलगा होईल. त्यामुळे आम्ही तशी तयारी केली होती. पण तरीही आम्ही मुलीचं एक नावही शॉर्टलिस्ट केलं होते. बाळ होऊ देण्याआधी सनी आणि मला एकत्र वेळ घालवायचा होता. नंतर आम्ही बाळाचं प्लॅनिंग केलं. त्यात आम्हाला बऱ्याच अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागला. कोणतीही वैद्यकीय समस्या नव्हती. तरीही मी गरोदर राहत नव्हते. त्यामुळे खूप तणावात होतो. पण देव योग्य वेळी आशीर्वाद देतो, असे डिंपल म्हणाली.

आई होणं माझं स्वप्न होतं. मला लहान मुलं खूप आवडतात. प्रेग्नेन्सी टेस्ट किटवर पॉझिटिव्ह साइन पाहिल्यानंतर मला विश्वासच बसत नव्हता. नंतर आम्ही सगळ्या चाचण्या करून गरोदर असल्याची खात्री करून घेतली, असं डिंपल म्हणाली. ते नऊ महिने खूप कठीण होते. मला खूप त्रास झाला. जेवणं जायचं नाही, मळमळ व्हायची. पहिले चार महिने मला द्रवपदार्थांवर होते, असेही तिने सांगितले. डिंपलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘कुछ इस तारा’, ‘अमृत मंथन’, ‘तुम्ही हो बंधू सखा तुम्ही’, ‘राजा की आएगी बारात’, ‘मिसेस पम्मी प्यारेलाल’, ‘बेइंतहा’, ‘किस देश मे है मेरा दिल’, ‘हम दोनो है अलग अलग’ या मालिकांमध्ये दिसली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...