मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण!; वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या मातेने त्यानंतर अवघ्या ६ तासांतच प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना करंजगाव (ता. वैजापूर) येथे बुधवारी (१० डिसेंबर) घडली. भाऊसाहेब कचरू गंडे (वय ६५) व लक्ष्मीबाई कचरू गंडे (वय ९०) असे मायलेकाचे नाव आहे.

भाऊसाहेब हे करंजगाव येथील गंडे वस्तीवर आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होते. ते पाच वर्षांपासून अर्धांगवायू आजाराने ग्रस्त होते. बुधवारी पहाटे पाचला त्यांना हार्टॲटॅक आला. यातच यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धक्का त्यांची ९० वर्षीय आई लक्ष्मीबाई सहन करू शकल्या नाहीत. त्यांना शोक अनावर झाला. त्यांनीही दुपारी पावणेबाराला प्राण सोडले. एकाच कुटुंबातील दोघांचा एकाच दिवशी अवघ्या सहा सातांच्या अंतराने मृत्यू झाल्यामुळे गंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मायलेकावर करंजगावच्या गंडेवस्तीवरच अंत्यविधी करण्यात आले.

बेगमपुऱ्यात बहिणीकडेच भावाची आत्‍महत्‍या
छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुऱ्यातील कोळीवाडा भागात ५८ वर्षीय राजेंद्र सांडुजी म्हस्के यांनी बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (११ डिसेंबर) दुपारी दीडलच्या सुमारास पडेगावच्या तारांगण सोसायटी परिसरात ही घटना समोर आली. राजेंद्र यांची बहीण तारांगण परिसरात राहते. राजेंद्र नेहमी त्यांच्याकडे येत-जात असत. गुरुवारीही बहिणीकडे आले. दुपारी कोणीच नसताना म्हस्के यांनी गळफास घेतला. छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software