गंगापूरजवळ ओव्हरटेकच्या नादात दोन कार, दुचाकीचा भीषण अपघात;  ८ जखमी, ५ जणांची प्रकृती अत्यवस्थ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन स्विफ्ट कारची समोरासमोर जोरात धडक झाली. त्याचवेळी मोटारसायकलही या अपघातग्रस्त कारवर येऊन धडकली. या विचित्र अपघातात ८ जण जखमी झाले. ही दुर्घटना  वैजापूर- गंगापूर रोडवरील जाखमतवाडी शिवारात आज, ६ डिसेंबरला दुपारी १ च्या सुमारास घडली. तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रत्‍यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्विफ्ट कार (क्र. एमएच ०६ एझेड ७७७०) वैजापूरकडून गंगापूरला जात होती. त्याचवेळी समोरून येणारी स्विफ्ट कार (क्र. एमएच ०४ डीएन ७१७४) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दोन्ही कार समोरासमोर धडकल्या. त्याचवेळी वैजापूरकडून येत असलेली मोटारसायकलही (क्र. एमएच २० डीएक्स २४४९) या अपघातग्रस्त कारवर धडकली. मोटारसायकलवरील दाम्पत्यही जखमी झाले. वैजापूरकडून गंगापूरला जात असलेल्या कारमधील अमरसिंग भैय्यासिंग बघेल (वय ६०), विजया अमरसिंग बघेल (वय ५५), सौरभ अमरसिंग बघेल (वय २८, सर्व रा. पीडब्ल्यूडी वसाहत, गंगापूर) आणि दुसऱ्या कारमधील बिलाल इकबाल पठाण (वय २०), फैजल अन्सार शहा (वय २९), मुस्तकीन बाबू शहा (वय २३, सर्व रा. गंगापूर) जखमी झाले.

मोटारसायकलीवरील दादासाहेब मारुती साळुंके (वय ६३) व मीनाबाई दादासाहेब साळुंके (वय ५८, रा. सिरसगाव, ता. वैजापूर) हे दाम्पत्यही जखमी झाले. नागरिकांनी मदतीला धावून जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारचा आठवडे बाजार असल्यामुळे अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. पोलीस अंमलदार मनोज घोडके, पद्मकुमार जाधव आणि अजितसिंग नागलोत यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली आहे. तपास पोलीस अंमलदार अमित पाटील करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!

Latest News

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक! कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या...
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार... 
सराफा व्यापाऱ्यावर ४ टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, दारू पिण्यासाठी पैसे मागत लाकडी दांड्याचे वार, व्यापारी जखमी, हडको एन ११ मधील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software