...म्हणून इसारवाडी फाटा ते पैठण रोडवर वाढले अपघात, शनिवारी रात्रीच्या घटनेने शेतकऱ्याला पाठवले हॉस्पिटलमध्ये, प्रकृती अत्यवस्थ!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इसारवाडी फाटा ते पैठण रोडवरील मुरमी गावाजवळ सीएनजी गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (२९ नोव्हेंबर) रात्री १० च्या सुमारास घडली.

संतोष भानुदास जाधव (वय ४५, रा. जिकठाण) असे जखमीचे नाव आहे. जाधव हे दुचाकीने (क्र. एमएच २० जीटी १४०२) गुरुधानोरा फाटामार्गे जिकठाणकडे जात होते. सीएनजी गॅस पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील मुरूम व मातीचे ढिगारे रस्त्यावरच पडून असल्यामुळे जाधव यांना त्याचा अंदाज आला नाही आणि त्यांची दुचाकी घसरून थेट खड्ड्यात कोसळली. जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणीजधाम यांच्या २४ तास विनामूल्य सेवेत असणाऱ्या ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी वाळूज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नागरिकांच्या सांगण्यानुसार, सीएनजी पाईपलाईनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक किंवा दिव्यांची व्यवस्था नसल्याने अपघात वाढले आहेत. ढिगारे रस्त्यातच टाकून ठेवल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या जिवाशी खेळ होतो. ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. वाहनधारकांनी या ठिकाणी तातडीने सुरक्षितता व्यवस्था, बॅरिकेडिंग व सूचना फलक लावावेत, अशी मागणी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software