१२ वीत शिकणाऱ्या तरुणीचे सिल्लोडमधून अपहरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : १२ वीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे सिल्लोड तालुक्‍यातील आमठाणा येथून अपहरण करण्यात आले आहे. ही घटना २२ सप्टेंबरला घडली. या प्रकरणात शुक्रवारी (२६ सप्टेंबर) मुलीच्या पित्‍याने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत राहणाऱ्या ४९ वर्षीय खासगी नोकरदाराने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी त्यांच्याकडे शिकते. तिसरी १५ वर्षे १० महिने वयाची मुलगी त्‍यांनी पाहुण्याकडे शिकायला शिंदेफळ येथे ठेवली होती. ती १२ वीत शिकते. पेपरसाठी फक्त कॉलेजला जाणे-येणे करते. तिला आमठाणा येथे शिवण क्लास लावण्यात आला होता. पाहुणे रोज मोटारसायकलीने तिची नेआण करत होते.

२२ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास पाहुण्यांनी मुलीला दुचाकीवरून क्‍लासला नेऊन सोडले. नंतर परत घेण्यासाठी गेले असता क्लासेसच्या महिलेने सांगितले, की मुलगी क्लास करून गेली आहे. त्यानंतर पाहुण्यांनी तिच्या मोबाइलवर कॉल केला. मात्र मोबाइल बंद येऊ लागला. आजूबाजूला शोध घेतला. तरीही ती मिळून आली नाही. इतके दिवस शोध घेतल्यानंतर अखेर तिच्या अपहरणाची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विष्णू कोल्हे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software