सिल्लोडमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही, भाजपने पुन्हा खाल्ली शिकस्त!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागूनही नागरिकांनी ती सिल्लोडमध्ये दिली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला शिकस्त खावी लागली आणि आ. अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमध्ये आपलीच सत्ता राहील, हे दाखवून दिले. ही निवडणूक सत्तारांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच त्यांनी मुलाला तर नगराध्यक्ष केलेच, पण २५ जागाही मिळवल्या.

आ. सत्तारांचे पूत्र अब्दुल समीर आता सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार मनोज मोरेल्लू यांचा २३ हजार ८९२ मतांनी पराभव केला. समीर यांना ३१ हजार ४३८ मते मिळाली तर मोरेल्लू यांना ७ हजार ८९२ मते मिळाली. या निवडणुकीची धुरा भाजपने सुरेश बनकर यांच्या खांद्यावर सोपवली होती. सत्तारांचे राजकीय शत्रू रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत भाजपच्या स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना फारशी साथ दिली नाही. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सिल्लोडमध्ये हजेरी लावली होती, तीही टीका होऊ लागली म्हणून. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडी मतदारांनी तर अजिबातच भारा दिला नाही. शिंदे गटाचे २५ तर भाजपचे ३, नगरसेवक निवडून आले आहेत. अन्य पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बनेखा पठाण यांनी १०३२ मते घेतली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software