रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!

On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील साहेबराव नारायण तुपे (वय ५५, रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (९ ऑगस्ट) मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.

तुपे यांच्यावर खासगी सावकार व बँकांचे चार लाख रुपयांचे कर्ज होते. ते कसे फेडावे, या विवंचनेतून त्‍यांनी आत्महत्या केली. राहत्या घरात कुटुंबीय झोपी गेल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार सकाळी त्यांची पत्नी व मुले उठल्यावर लक्षात आला. तुपे यांना फासावरून उतरवून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, असा परिवार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Tech News : UPI मधून कापले गेले, पण समोर पैसे मिळालेच नाहीत?

Latest News

Tech News : UPI मधून कापले गेले, पण समोर पैसे मिळालेच नाहीत? Tech News : UPI मधून कापले गेले, पण समोर पैसे मिळालेच नाहीत?
तुमच्यासोबत कधीतरी असे घडले असेल की UPI द्वारे एखाद्याला पेमेंट करूनही, दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट मिळाले नाही. जर हो, आणि तुम्हाला...
दातांवरून कळते भविष्य अन्‌ स्वभाव, तुम्हाला जाणून घ्यायचे कसे?
५ सरकारी नोकऱ्या... अर्ज भरण्याची तारिख जाईल उलटून, लगेच करा अर्ज...
मोठी बातमी : नारळीबागेत आशीर्वाद गोल्‍ड फर्मवर पोलिसांचा छापा!; २२ कॅरेटचे सोने २४ कॅरेटचे सांगून विकायचे, जाहिरात करणारा रिलस्टारही गोत्‍यात!!, सराफा व्यावसायिकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software