छत्रपती संभाजीनगरमधून ७ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अट्टल दुचाकीचोरट्याच्या मुसक्या जवाहरनगर पोलिसांनी बीड बायपास भागातील खडी रोडवर आवळल्‍या. त्‍याच्या ताब्‍यातून २ लाख ७० हजार रुपयांच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. राहुल ऊर्फ पप्पू बबन राठोड (वय २२, रा. नाईकनगर बीड बायपास) असे संशयित चोराचे नाव आहे.

५ ऑगस्टला किरण जगन मुंढे (वय २४, रा. कासलीवाल पुरम सोसायटी चिकलठाणा) हे आई-वडिलांना घेऊन सिग्मा हॉस्पिटलमध्ये आले होते. त्‍यांनी त्यांची स्कुटी (एमएच १२ -जीएक्स १०२५) हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली होती. चोरट्याने ती चोरून नेली. मुंढे यांनी ६ ऑगस्टला जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. ७ ऑगस्टला गस्‍त घालत असताना पोलीस अंमलदार शोन पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की एक मोटारसायकलचोर हा खडी रोड बीड बायपास येथे चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार आहे. ही माहिती तत्काळ त्‍यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना दिली.

त्‍यांनी लगेचच चोराला पकडण्याचे आदेश दिले. त्‍यानंतर पोलीस अंमलदार शोन पवार व जावेद पठाण खडी रोडकडे गेले. तिथे संशयित राहुल राठोड दिसला. मात्र पोलिसांना पाहून तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्‍याने स्‍कुटीचोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्‍याची कसून चौकशी केली असता त्‍याने छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्‍याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

या कोठडीतील चौकशीत त्‍याने मुंढे यांच्या मोपडेसह आणखी ६ मोटासायकली चोरल्याची कबुली दिली. त्‍याच्या ताब्‍यातून २ लाख ७० हजार रुपयांच्या ७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्‍याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात एकूण १० मोटारसायकलीचे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार रेवती थोरवडे, पोलीस अंमलदार शोन पवार, जावेद पठाण, संदीप क्षीरसागर, पोलीस अंमलदार मारोती गोरे, मंगेश घुगे यांनी ही कारवाई पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नारळीबागेत आशीर्वाद गोल्‍ड फर्मवर पोलिसांचा छापा!; २२ कॅरेटचे सोने २४ कॅरेटचे सांगून विकायचे, जाहिरात करणारा रिलस्टारही गोत्‍यात!!, सराफा व्यावसायिकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : नारळीबागेत आशीर्वाद गोल्‍ड फर्मवर पोलिसांचा छापा!; २२ कॅरेटचे सोने २४ कॅरेटचे सांगून विकायचे, जाहिरात करणारा रिलस्टारही गोत्‍यात!!, सराफा व्यावसायिकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : नारळीबागेत आशीर्वाद गोल्‍ड फर्मवर पोलिसांचा छापा!; २२ कॅरेटचे सोने २४ कॅरेटचे सांगून विकायचे, जाहिरात करणारा रिलस्टारही गोत्‍यात!!, सराफा व्यावसायिकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारळीबागेतील पावन गणेश मंदिरासमोर असलेल्या आशीर्वाद गोल्‍ड या फर्मवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (१०...
रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!
रात्री १० ला घरातून विवाहिता निघून गेली, सकाळी ११ ला मृतदेह आढळला विहिरीत, लासूरस्टेशनची खळबळजनक घटना
'एमआयएम' पदाधिकारी, माजी नगरसेविकेचा पती हातभट्टी दारू धंद्यात!; गजबजलेल्या वस्तीत अड्डा, जिन्सी पोलिसांच्या हद्दीत शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधून ७ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software