- Marathi News
- सिटी क्राईम
- 'एमआयएम' पदाधिकारी, माजी नगरसेविकेचा पती हातभट्टी दारू धंद्यात!; गजबजलेल्या वस्तीत अड्डा, जिन्सी पोल...
'एमआयएम' पदाधिकारी, माजी नगरसेविकेचा पती हातभट्टी दारू धंद्यात!; गजबजलेल्या वस्तीत अड्डा, जिन्सी पोलिसांच्या हद्दीत शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्या हद्दीत अत्यंत गजबजलेल्या भागात हातभट्टीचा मोठा दारू अड्डा चालतोय, हे जणू जिन्सी पोलिसांना माहीतच नव्हते. इतके दिवस राजरोस सुरू असलेला हातभट्टीचा मोठा अड्डा शेवटी शहर गुन्हे शाखेला जाऊन उद्ध्वस्त करावा लागला. शनिवारी (९ ऑगस्ट) दुपारी चारला शहा बाजारमधील रवींद्रनगरात अनिसा शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरलेली विविध रसायने पोलिसांनी जप्त केली. अड्डाचालक आरेफ हुसैनी हा छापा पडताच पळून गेला. तो एमआयएमचा राज्य प्रवक्ता आणि माजी नगरसेविकेचा पती असल्याची पुष्टी पोलिसांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वास्तुशास्त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
By City News Desk
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
By City News Desk
लग्नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्यू, कन्नडची घटना
By City News Desk
Latest News
11 Aug 2025 15:30:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारळीबागेतील पावन गणेश मंदिरासमोर असलेल्या आशीर्वाद गोल्ड या फर्मवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (१०...