जशास तसे : दुकानदाराने कचरा रस्‍त्‍यावर फेकला, मुख्याधिकाऱ्यांनी तोच कचरा उचलून पुन्हा त्‍याच्या दुकानात आणून टाकला!; वैजापूरमध्ये खळबळ

On

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर रस्त्यावरील अजित कलेक्शन या कापड दुकानदाराने रस्त्यावर कचरा फेकला होता. नगर पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी तो पाहिला आणि चौकशी करून तो कचरा पुन्हा त्‍याच्या दुकानात नेऊन टाकला. या जशास तसे प्रकाराची चर्चा जिल्हाभरात चवीने होत आहे. शुक्रवारी ( ८) सकाळी ही घटना घडली.

वैजापूर शहरात अस्वच्‍छता, घाणीचे साम्राज्‍य निर्माण झाले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शहर स्वच्छ करण्यासाठी बिघोत यांनी कंबर कसली आहे अनेक दुकानदार, नागरिक रस्त्यावर कचरा आणून टाकतात. त्‍यामुळे बिकट परिस्थिती उद्‌भवत असल्याचे लक्षात आल्यावर बिघोत यांनी शुक्रवारी सकाळीच गंगापूर रस्त्यावर पाहणी केली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा फेकलेला पाहून त्‍यांनी हा कचरा कोणी फेकला, अशी कसून चौकशी सुरू केली. अजित कलेक्शनवाल्याने कचरा फेकल्याचे कळताच तोच कचरा उचलून त्‍यांनी त्‍याच्या दुकानात नेऊन टाकला.

हा प्रकार पाहून नागरिकही अचंबित झाले. मुख्याधिकाऱ्यांनी दुकानदाराला चांगलेच खडसावले. आता कसं वाटतंय?, असा प्रश्न दुकानदाराला केला, तेव्हा दुकानदाराचा चेहरा उतरला होता. यापुढे कचरा रस्‍त्‍यावर फेकला तर कारवाई करेन, असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी दिला आणि १ हजार रुपयांचा दंडही भरून घेतला. मुख्याधिकाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे रस्‍त्‍यावर कचरा फेकणारे दुकानदार, अस्वच्‍छता पसरवणारे नागरिक धास्तावले आहेत, तर शहरवासियांत मात्र या कारवाईचे स्वागत होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!

Latest News

रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!! रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील साहेबराव नारायण तुपे (वय ५५, रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
रात्री १० ला घरातून विवाहिता निघून गेली, सकाळी ११ ला मृतदेह आढळला विहिरीत, लासूरस्टेशनची खळबळजनक घटना
'एमआयएम' पदाधिकारी, माजी नगरसेविकेचा पती हातभट्टी दारू धंद्यात!; गजबजलेल्या वस्तीत अड्डा, जिन्सी पोलिसांच्या हद्दीत शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधून ७ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
असून अडचण, नसून खोळंबा : शिवाजीनगर भुयारी मार्ग तुंबत होता, आता छत गळू लागले!, काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यावर शिक्‍कामोर्तब
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software