- Marathi News
- सिटी डायरी
- असून अडचण, नसून खोळंबा : शिवाजीनगर भुयारी मार्ग तुंबत होता, आता छत गळू लागले!, काम निकृष्ठ दर्जाचे झ...
असून अडचण, नसून खोळंबा : शिवाजीनगर भुयारी मार्ग तुंबत होता, आता छत गळू लागले!, काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यावर शिक्कामोर्तब
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा-देवळाईला शहराशी जोडणाऱ्या शिवाजीनगर भुयारी मार्गात आतापर्यंत पाणी तुंबत होते. आता हा स्लॅब गळायला लागला आहे. त्यामुळे हा भुयारी निकृष्ठ दर्जाचा बनल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याचे खापर जागतिक बँक प्रकल्प विभागाने रेल्वे स्थापत्य विभागावर फोडले असून, रेल्वे प्रशासन चुका दुरुस्त करणार असल्याचे म्हणत आहे. हा भुयारी मार्ग असून अडचण, नसून खोळंबा झाला आहे.
जागतिक बँक प्रकल्प विभाग : भुयारी मार्गाचे काँक्रीटीकरण अन् वॉल स्ट्रक्चर
रेल्वे स्थापत्य विभाग : पूल स्ट्रक्चर अन् ड्रेनेज व्यवस्था
काय अडचण झाली?
-रेल्वेच्या स्थापत्य विभागाला ड्रेनेजची भौगोलिक निर्वहन क्षमता लक्षात आली नाही. त्यामुळे पाऊस होताच भुयारी मार्ग तुंबत आहे.
-आता छताला गळती लागल्याने कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-भुयारी मार्गावर आतापर्यंतचा एकूण खर्च १० कोटींच्या पुढे गेला आहे.
-मे महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर भुयारी मार्ग तुंबून कामाची पोलखोल झाली होती.
-आता गळती लागलेले छत दुरुस्त केले जाईल, असे रेल्वे सांगत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वास्तुशास्त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
By City News Desk
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
By City News Desk
लग्नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्यू, कन्नडची घटना
By City News Desk
Latest News
11 Aug 2025 15:30:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारळीबागेतील पावन गणेश मंदिरासमोर असलेल्या आशीर्वाद गोल्ड या फर्मवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (१०...