छ. संभाजीनगर-पुणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेला लागूनच रेल्वेमार्ग करण्याचे नियोजन?, १०० किमीचे अंतर होणार कमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेलगतच नागपूर-पुणे रेल्वेमार्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असा रेल्वेमार्ग झाला तर रेल्वेने पुण्याला जातानाचे अंतर १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितल्याने छत्रपती संभाजीनगरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे रविवारी (१० ऑगस्ट) नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने नागपूरच्‍या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्‍यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व पुणे हा औद्योगिक पट्टा असून येथील विकास साधायचा तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन एक्सप्रेस वे निर्माण करण्यात येणार असून त्याच्या ‘राईट ऑफ वे’मध्ये रेल्वे मार्गाचा विचार केल्यास प्रवासाचे अंतर अधिक कमी करता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.  सध्या नगर-दौंड मार्गे पुणे येथे जाणाऱ्या गाडीला शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा फेरा पडतो. त्यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाला असे सुचवण्यात आले आहे की, नगर ते पुणे असा थेट मार्ग तयार करण्यात आला तर प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळही वाचेल. पुढील काळात याबाबत नियोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्‍हणाले. यापूर्वी खा. डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर लोहमार्गाचा डीपीआर झाल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या नव्या माहितीमुळे नेमके काय आणि कसे होणार, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!

Latest News

रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!! रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील साहेबराव नारायण तुपे (वय ५५, रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
रात्री १० ला घरातून विवाहिता निघून गेली, सकाळी ११ ला मृतदेह आढळला विहिरीत, लासूरस्टेशनची खळबळजनक घटना
'एमआयएम' पदाधिकारी, माजी नगरसेविकेचा पती हातभट्टी दारू धंद्यात!; गजबजलेल्या वस्तीत अड्डा, जिन्सी पोलिसांच्या हद्दीत शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधून ७ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
असून अडचण, नसून खोळंबा : शिवाजीनगर भुयारी मार्ग तुंबत होता, आता छत गळू लागले!, काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यावर शिक्‍कामोर्तब
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software