- News
- जिल्हा न्यूज
- वेरूळमध्ये धक्कादायक चोरी : चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन छोटा हत्ती वाहनात टाकून नेले!; १६ लाख ७७ हजार...
वेरूळमध्ये धक्कादायक चोरी : चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन छोटा हत्ती वाहनात टाकून नेले!; १६ लाख ७७ हजारांची रोकड होती...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : वेरूळ लेणीसमोरील एसबीआय बँकेचे एटीम मशीन आज, ११ सप्टेंबरला पहाटे तीनला चार ते पाच चोरट्यांनी छोट्या हत्ती गाडीत घालून लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या एटीएममध्ये १६ लाख ७७ हजार १०० रुपयांची रोकड होती, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
श्वानपथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. खुलताबाद पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी तोंडाला काळा बुरखा बांधलेला होता. एटीएम केंद्रात ३ वाजून ३ मिनिटांनी आले, अवघ्या १० मिनिटांत एटीएम मशीन छोटा हत्ती वाहनात घेऊन गेले. चोरट्यांनी छोटा हत्ती वाहन वाळूज एमआयडीसीमधून चोरून आणल्याचे समोर आले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 19:51:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...

