सत्तारांचा ‘जोर’ ओसरताच रावसाहेब दानवेंकडून सिल्लोडकडे लक्ष!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोडचे आमदार अब्‍दुल सत्तार आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील भांडण सर्वश्रुत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे भांडण पार टोकाला गेले होते. लोकसभा निवडणुकीत दानवेंच्या पराभवात आपला हात असल्याची कबुली खुद्द सत्तारांनी दिली होती. त्‍यानंतर विधानसभा निवडणुकीत सत्तारांच्या तोंडाला फेस आणण्याचे काम रावसाहेब दानवेंनी केले. सत्तारांचा निसटता विजय झाला. सध्या सत्तार मंत्रिमंडळात नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचा जोर काहीसा ओसरल्याचे मतदारसंघात दिसून येत आहे. प्रसारमाध्यमांतही त्‍यांची चर्चा फार होत नाही. याचा फायदा उचलून रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांत सिल्लोड तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (२० सप्‍टेंबर) सकाळी ११ ला तालुक्‍यात पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. चारनेर, चारनेरवाडी, आधारवाडी, पिंपळगाव घाट, धावडा, देऊळगाववाडी, देऊळगाव बाजार, सावखेडा, बोरगाव बाजार, बोरगाव सारवानी आदी गावांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले असून, याबाबतचे योग्य पंचनामे कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहता कामा नये, यासाठी चावडीवर वाचन करण्याच्या सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला केल्या. तुटलेले रस्ते, खचलेली बांधकामे यांचीही लवकरात लवकर पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्यासोबत माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, भाजपा प्रदेश सचिव सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी, जिल्हा सचिव कमलेश कटारिया, सुनील मिरकर, अशोक गरुड, मकरंद कोर्डे, दिलीप दानेकर, विजय वानखेडे, चंद्रशेखर साळवे, मंडळ अध्यक्ष एकनाथ हिवाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software