सिल्लोड, कन्‍नडमध्ये अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांची जोरदार कारवाई, कन्‍नडमध्ये गुन्हेगारांसोबत पोलिसांची धुमश्चक्री!; एपीआयसह अंमलदार जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथे अवैध कत्तलखान्यावर रविवारी (२१ सप्‍टेंबर) पहाटे ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. ३८० किलो गोमांस, दोन जीवंत गायी, एक नुकतीच कापलेली गाय, सुरे, कुऱ्हाड, तराजू, माप, मांस कापणीसाठी लाकडी ठोकळे असा एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छापा मारल्‍यानंतर संशयित पसार झाले.

अन्सार कुरेशी, इलियास कुरेशी, गालिब कुरेशी आणि लादेन कुरेशी (सर्व रा. डोंगरगाव) यांच्याविरद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे, पोलीस अंमलदार सतीश पाटील, संजय आगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.  सिल्लोडसह जवळच्या तालुक्‍यांतून गेल्या काही दिवसांत अनेक जनावरी चोरीला जात आहेत. कत्तलखान्यात आढळलेली जनावरे ही चोरी करून आणल्याचाही संशय आहे. 

कन्‍नडजवळील कत्तलखान्यातून वाचवली ५३ जनावरे
कन्‍नड शहराजवळील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा मारून ५३ जनावरे वाचवली. यावेळी कत्तलखाना चालवणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस अंमलदार मुस्ताक पटेल जखमी झाले आहेत. कन्‍नडच्या बारामती साखर कारखान्याजवळील जिओ पेट्रोलपंपाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये हा कत्तलखाना चालवला जात होता. शनिवारी (२० सप्‍टेंबर) रात्री ही कारवाई करण्यात आली. कारवाईत १ पिकअप वाहन, १ कार, ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सय्यद अल्ताफ सय्यद फकीर (रा. इंदिरानगर, कन्नड) असे संशयिताचे नाव आहे. त्‍याने साथीदारांसोबत मिळून जनावरे चोरून आणत कत्तल करत असल्याची कबुली दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software