ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाचा हार्टॲटॅकने मृत्‍यू!; सेवानिवृत्तीसाठी बाकी होते एकच वर्ष..., खुलताबादची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : खुलताबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अंबादास कचरू मोरे (वय ५७) यांचा रविवारी (१४ सप्‍टेंबर) सायंकाळी हार्टॲटॅकने कर्तव्यावर असतानाच मृत्‍यू झाला. त्‍यांचे सेवानिवृत्तीसाठी एकच वर्ष बाकी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे.

मोरे मूळचे खिर्डीचे (ता. खुलताबाद) होते. खुलताबाद शहर, मावसाळा, नंद्राबाद, शूलिभंजन, कागजीपुराची जबाबदारी त्‍यांच्याकडे होती. शनिवारी रात्री त्यांनी या परिसरात गस्त घातली. रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात आले असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना पडेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना संध्याकाळी त्यांना हार्टॲटॅक आला. तीन महिन्यांपूर्वी ते बदलून धाराशिव येथून खुलताबादला आले होते. त्‍यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस हेडकॉन्स्टेबल व सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software