उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली अतिवृष्टीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सकाळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

आमदार विलास भुमरे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड हे याप्रसंगी उपस्थित होते. अंबिकापूर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील मोसंबी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची त्यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मोसंबीसारखे फळपिक आणि ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे आहे, असे त्यांनी सांगितले. यंत्रणेला त्वरीत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. त्यानंतर श्री. सामंत हे जालना जिल्ह्यातील भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ

Latest News

मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पैठणखेडा येथे ४० वर्षीय युवकाचा मृतदेह त्याच्या शेजारी...
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software