सोयगाव तालुक्यात कोणत्या उमेदवाराने कोणत्या पक्षाकडून केला उमेदवारी अर्ज दाखल जाणून घेऊ..., ३ गटांसाठी २२ तर ६ गणांसाठी ४७ अर्ज

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोयगाव तालुक्यातील तीन गट आणि सहा गणांसाठी आज, २१ जानेवारीला एकूण ६९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे यांनी दिली.

आमखेडा गटासाठी चार तर गोंदेगाव गटासाठी दहा आणि फर्दापूर गटासाठी आठ असे २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या सावळदबारा गणासाठी १२, फर्दापूर-६, आमखेडा-६, निंबायती-८, गोंदेगाव-५ आणि बनोटी-१० असे एकूण ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
-आमखेडा गटात भाजपकडून पुष्पा काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे गटाकडून मोनाली पवार, बसपकडून उर्मिला इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
-फर्दापूर गटात भाजपकडून माहीन इद्रीस मुलतानी यांनी दोन तर नौसीन सलीम खान मुलतानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सीमा जयप्रकाश चव्हाण यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शिंदे सेनेकडून उमा धरमसिंग चव्हाण, प्रभावती दारासिंग राठोड यांनी अर्ज दाखल केले. देवकाबाई राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून सपना राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-गोंदेगाव गटातून शिंदे गटाकडून पूजा वाघ, मनीषा पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) कडून समीना तडवी, उद्धव सेनेकडून सुनीताबाई चव्हाण, भाजपकडून सविता बागुल, मनीषाबाई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) कडून सुशीलाबाई सोनवणे, संगीता नवळे यांनी तर लक्ष्मीबाई जाधव, सरला तातळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.

सत्यप्रतसाठी ऐनवेळी धावपळ
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांची मतदार यादीवरील सत्यप्रतसाठी ऐनवेळी धावपळ उडाली होती, तर काहींना पक्षाचा बी फॉर्म मिळाला नव्हता. सहा गणांतून सावळदबारा गणातून भाजपकडून तीन, शिंदे सेनेकडून तीन, काँग्रेसकडून एक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एक, उद्धव सेनेकडून दोन आणि वंचित बहुजन एक आणि अपक्ष एक असे बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. फर्दापूर गणातून शिंदे सेना दोन, भाजप तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एक असे अर्ज दाखल झाले आहेत. आमखेडा गणातून भाजप दोन, शिंदे सेना दोन, वंचित बहुजन एक आणि अपक्ष एक असे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

निंबायती गणातून भाजप एक, राष्ट्रवादी (अजित पवार एक) शिंदे सेना एक, बसप एक, रायभान जाधव आघाडी एक, अपक्ष दोन आणि उद्धव सेना एक असे आठ अर्ज दाखल झाले आहेत. गोंदेगाव गणातून शिंदे सेना एक, उद्धव सेना एक, भाजप एक, राष्ट्रवादी (अजित पवार) एक, राष्ट्रवादी( शरद पवार) एक असे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बनोटी गणातून शिंदे गट एक, एमआयएम-१, उद्धव सेना-१, भाजप एक, वंचित बहुजन एक, अपक्ष पाच असे दहा अर्ज दाखल झाले आहेत. अत्यंत उत्कंठा लागलेल्या निंबायती गणातून अखेर सविता सोपान गव्हांडे यांना शिंदे सेनेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी निंबायती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

Latest News

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले... भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software