अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला उद्‌ध्वस्त, गंगापूर तालुक्‍यातील कारवाई, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारातील अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गंगापूर पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला आहे. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरला येत असताना त्‍यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्‍यांनी थांबून व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असता तिथल्या गुन्हेगारांनी त्‍यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यामुळे आरडाओरड करत कार्यकर्ते महामार्गावर धावले. त्‍यामुळे अनेक वाहने थांबली. त्‍यानंतर गुन्हेगार पळून गेले. या ठिकाणावरून ९१ गॅसच्या टाक्या आणि २८ हजार लिटर क्षमतेचा गॅसचा टँकर पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (२७ सप्टेंबर) पहाटे करण्यात आली.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते गंगेश्वर सोनवणे, विजय ऊर्फ बाबुराव कांबळे, भीमराव बरकडे, शिवाजी चव्हाण, सुरेखा गायकवाड, संगीता नानेकर, शन्नो शेख आणि हरियाली कौर हे छत्रपती संभाजीनगरला येत होते. त्यांना भेंडाळा फाट्याजवळील एका कॅफेजवळ संशयास्पदरीत्या गॅस रिफिलिंग होत असल्याचे दिसले. त्यांनी तेथे थांबून व्हिडीओ शूटिंग सुरू केले. ही बाब लक्षात येताच कामगारांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. हल्ल्यामुळे घाबरून कार्यकर्ते आरडाओरड करत महामार्गावर धावले. त्यामुळे अनेक वाहने थांबली.

लोक जमू लागल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. गंगापूर पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना २१ व्यावसायिक गॅसच्या टाक्या व एचपी गॅसचा टँकर (केए-०१-एएच-०८२८) आढळला. पोलिसांनी ३२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टँकरचालक परवेज जियादिन शाह (रा. दाताडा, जि. चंद्रपूर) याला अटक केली आहे. २ हल्लेखोर पसार झाले आहेत. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक संतोष झोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software