- News
- जिल्हा न्यूज
- फुलंब्री, कन्नड, वैजापूरमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना : वाणेगावमध्ये स्वतःच्या शेतात, पिशोर अन्...
फुलंब्री, कन्नड, वैजापूरमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना : वाणेगावमध्ये स्वतःच्या शेतात, पिशोर अन् शिऊरमध्ये राहत्या घरात उचलले टोकाचे पाऊल!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना वाणेगाव (ता. फुलंब्री) शिवारात बुधवारी (१७ डिसेंबर) सकाळी ११:३० च्या सुमारास समोर आली.
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपूर परिसरात ६० वर्षीय भीमराव येसूबा मोकासे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१७ डिसेंबर) दुपारी सव्वाच्या सुमारास समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यावर सायंकाळी पाचला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.
वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव (खं.) येथे मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी पोपट सर्जेराव काटे (वय ४०) या शेतकऱ्याने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने ते चिंतित होते. त्यांच्यावर बँकेचे पिक कर्ज, सहकारी संस्था तसेच खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. सायंकाळी ही घटना समोर येताच कुटुंबीयांनी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद शिऊर पोलिसांनी घेतली आहे. काटे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 17:26:08
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...

