भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर रागाच्या भरात ३० वर्षीय युवकाने रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घायगाव (ता. वैजापूर) शिवारात शनिवारी (१४ मार्च) दुपारी चारच्या सुमारास घडली. संजीवकुमार रामचंद्र मंडल (वय ३०, रा. बिहार) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

बिहारचे काही मजूर विनायक व्यवहारे यांच्या घायगाव शिवारातील गोदामावर मका भरण्याच्या कामासाठी आले आहेत. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास संजीवकुमार आणि त्यांच्या भावामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या संजीवकुमारने गळ्यातील रूमालाने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच सोबतच्या मजुरांनी त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे पाठविण्यात आला आहे. घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी घेतली आहे. संजीवकुमारच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

खुलताबाद तालुक्यात ऊसतोड मजुराची आत्‍महत्‍या
खुलताबाद तालुक्यातील सोनखेड येथे भीमनगर वस्तीतील रहिवासी भीमराव उर्फ दिनेश अंबादास बनकर (वय ३६) या विवाहित युवकाने शुक्रवारी (१३ मार्च) रात्री ९ च्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. तो ऊसतोड मजूर म्हणून काम करायचा. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, ३ मुली असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software