देवामामा आम्हाला रस्ता पाहिजे... शाळकरी विद्यार्थी उतरले पाण्यात!; जलसमाधी आंदोलनाने चुकला पोलिसांच्या काळजाचा ठोका!; गंगापूर तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : देवामामा आम्हाला रस्ता पाहिजे, असे आर्जव करत चिमुकले विद्यार्थी हातात रस्त्याच्या मागणीचे फलक घेऊन पाण्यात उतरल्याचे पाहून पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. गंगापूर तालुक्यातील जुनी झांजर्डी ते आनंदवाडी या अवघ्या दोन किलोमीटर रस्त्यासाठी हा एल्गार ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज, १७ ऑक्‍टोबरला छेडला. विशेष म्‍हणजे, आंदोलन सुरू झाल्यानंतर दीर्घकाळ उलटूनही गंगापूरच्या तहसीलदारांनी दखल घेतली नाही. यावरून प्रशासन किती कडक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्‍त केला.

WhatsAppImage2025-10-17at11.02.23AM

अनेक वर्षांपासून ग्रामस्थ प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र रस्त्याचे काम झालेले नाही. यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. वैतागलेले १०० हून अधिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी सकाळी दहाला ढोरेगाव परिसरातील पाण्यात उतरले. यापूर्वी ७ ऑक्टोबरला गंगापूरच्या तहसीलदारांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मात्र त्‍यांनी निवेदनाकडे दुर्लक्ष केले. १० दिवस उलटूनही त्यांचा कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. रस्त्याच्या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यांना शाळेत येणेजाणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत. विद्यार्थ्यांनी दिवाळीपूर्वी रस्ता मिळणार का?, अधिकारी खोटं बोलतात, अशा घोषणांतून रोष व्यक्त केला. तातडीने रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुढील टप्प्यात ग्रामस्थ उपोषणाला बसतील आणि रास्ता रोको करतील, असा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनात रामेश्वर गावंडे, योगेश गावंडे, भाऊ काजळे, गोपीनाथ गावंडे, राहुल काजळे, प्रणव गावंडे यांच्यासह महिला, तरुण, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल

Latest News

महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या विकृताविरुद्ध गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (१० मार्च)...
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software