विशेष : नायगव्हाण येथील नवसाला पावणारी बेलजामाता : श्रद्धा आणि लोकपरंपरेचे प्रतीक, छ. संभाजीनगरहून २५ किलोमीटर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्रात अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत, ज्यांची ख्याती चमत्कार आणि भक्तांच्या श्रद्धेमुळे वाढली आहे. याच मंदिरांपैकी एक म्हणजे नवसाला पावणारी बेलजामाता. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ते लोकपरंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनले आहे.

बेलजामाता देवीच्या मंदिराचा इतिहास नेमका कधी सुरू झाला, याची ठोस माहिती उपलब्ध नसली तरी, याची एक आख्यायिका आहे. मंदिरांच्या पुजाऱ्याने सांगितले, की काही पिढ्यांपूर्वी नायगव्हाण येथील महिला शेजारच्या गावांत सकाळच्या पूजेसाठी घरोघर बेलाची पाने पुरवायची.  बदल्यात गावकरी त्या महिलेला धान्य देत असत. एके दिवशी पूजेसाठी बेल- पान वाटप करण्यासाठी जात असताना त्या महिलेच्या टोपलीतून एक बेल पान नायगव्हाण शिवारात पडले. जमिनीवर पडलेले पान पूजेसाठी चालत नसल्यामुळे ती बेल पान वाटप करणारी महिला हातमाळीला निघून गेली.

त्यानंतर ती परत नायगव्हाणकडे जात असताना बेल पान पडलेल्या ठिकाणी देवी प्रगट झाल्याचे दिसले. त्या महिलेने ही वार्ता ग्रामस्थांना सांगितली. यानंतर तेथे देवीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. दरवर्षी नवरात्रीमध्ये येथे गावातील व परिसरातील भाविक नऊ दिवस देवीजवळच राहतात. ज्यांनी देवीचा उपवास ठेवला आहे ते गावाची शिव ओलांडत नाही. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरांमधून या मंदिराचे महत्त्व दिसून येते. देवीला नवसाला पावणारी असे विशेषण तिच्या भक्तांनीच दिले आहे. अपत्यप्राप्ती, विवाह, आरोग्य आणि व्यवसायात यश अशा अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी भाविक येथे नवस करतात. नवस पूर्ण झाल्यावर ते पुन्हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात. ही श्रद्धाच या मंदिराचे खरे वैशिष्ट्य आहे.

यात्रेचे स्वरूप
बेलजामाता देवीचा वार्षिक उरूस चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरतो. या दोन दिवसांच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेदरम्यान गावातील वातावरण पूर्णपणे धार्मिक आणि उत्साही असते. बेलजामातेची यात्रा केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित नाही. ती सामाजिक एकतेचेही प्रतीक आहे. यात्रेच्या काळात विविध जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, ते एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे, जिथे लोक एकमेकांचे दुःख आणि आनंद वाटून घेतात. नवरात्रीच्या अष्टमीला येथील दीप माळ पेटवली जाते. बेलजामाता मंदिराची ही परंपरा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृती आणि लोकपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software