जिल्हा बँकेचा कारभार : दुचाकीवरून वृद्ध लिपिक घेऊन निघाला २५ लाख रुपये, मध्येच दोन लुटारूंनी अडवले, मारहाण करून पूर्ण रोकड लांबवली!, पैठणची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठणच्या शाखेतून दावरवाडी (ता. पैठण) येथील शाखेत २५ लाख रुपयांची रक्कम घेऊन येणाऱ्या जिल्हा बँकेच्या लिपिकाला मध्येच दोघांनी लुटले. लुटारूंच्या मारहाणीत लिपिक जखमी झाला आहे. ही घटना पैठण-पाचोड मार्गावरील दावरवाडी शिवारात शनिवारी (१५ नोव्‍हेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

दावरवाडीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उपशाखा असून, या शाखेत गणेश आनंद पहिलवान (वय ६५) लिपिक आहेत. बँकेच्या दैनंदिन व्यवहारासाठी व शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम देण्यासाठी २५ लाख रुपये त्यांनी पैठणच्या शाखेतून घेतले आणि स्कूटीने (एमएच २० डिझेड ८३७४) दावरवाडीकडे येत होते. दावरवाडीजवळ आल्यानंतर अचानक मागून दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी त्यांना जोरात दगड मारला. पहिलवान यांनी दगड चुकवला. नंतर तोंड बांधलेल्या लुटारूंनी दुचाकी आडवी लावून पहिलवान यांना थांबवले. काही कळण्याच्या आतच पहिलवान यांच्यावर हल्ला चढवून खाली पाडत मारहाण सुरू केली.

नंतर स्कूटीच्या डिक्कीतील कापडी पिशवीत असलेले २५ लाख रुपये घेऊन त्यांनी पाचोडच्या दिशेने धूम ठोकली. पहिलवान यांनी जिल्हा बँकेच्या तालुका कर्ज अधिकारी श्याम तांगडे यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. त्यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, गोविंद राऊत यांनीही सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. लुटारूंच्या मारहाणीत पहिलवान यांच्या डाव्या हात, पाय आणि पंज्याला जबर मार लागला आहे. एवढी मोठी रक्कम अशी दुचाकीवरून, तीही वृद्ध लिपिकाकडे देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software