मध्यरात्रीतून बसवला विनापरवानगी पुतळा, करमाड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कौडगाव जालना (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे विनापरवानगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आल्याचे समोर आल्याने करमाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी सीमा शिरसाठ यांनी तक्रार दिली होती.

सीमा शिरसाठ यांच्या तक्रारीनुसार, त्या छत्रपती संभाजीनगरच्या जयहिंदनगरी पिसादेवीत राहतात. कौडगाव जालना (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व बाजूला ग्रामपंचायतच्या जागेवर रात्री कोणीतरी एक सिमेंटचा चबुतरा तयार करून त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविला आहे, अशी माहिती मिळाल्याने त्या व ग्रामपंचायत शिपाई प्रभाकर अंबिलढगे यांनी जाऊन पाहणी केली.

१३ नोव्‍हेंबरला रात्री ८ नंतर १४ नोव्‍हेंबरच्या सकाळी ७ पर्यंत कुणीतरी सिमेंटचा चबुतरा तयार करून त्याला पिवळ्या रंगाचा कपडा लपेटून अर्धाकृती पुतळा बसविल्याचे दिसून आले. पुतळ्याची पाऊस, ऊन व वारा यापासून संरक्षण होईल अशी कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे विटंबना होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. ग्रामपंचायतीने पुतळा बसविण्यासाठी कोणालाही लेखी अथवा तोंडी परवानगी दिलेली नसल्यामुळे पुतळा हा अनधिकृतरित्या बसविल्याचे तक्रारीत सीमा शिरसाठ यांनी म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software