- News
- जिल्हा न्यूज
- महावितरणच्या हलगर्जीपणाने घेतला १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक...
महावितरणच्या हलगर्जीपणाने घेतला १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक, वाळूज परिसरातील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतात लोंबकळत असलेल्या तारांबाबत वारंवार वीज महावितरणच्या अभियंता आणि वायरमनला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने १४ वर्षीय मुलाचा वीजप्रवाहित तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) शिवारात मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी ८ ला घडली. दरम्यान, या घटनेविरोधात संतप्त गावकऱ्यांनी शुक्रवारी (९ जानेवारी) तुर्काबाद खराडी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
घटनेविरोधात संतप्त गावकऱ्यांनी तुर्काबाद खराडी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. अभियंता मुफीक शेख याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली. अनेक गावांत विद्युत रोहित्राचे जीर्ण फ्युज बॉक्स, झुकलेले व मोडकळीस आलेले विद्युत पोल, लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारांमुळे नागरिक, विद्यार्थी, महिला व शेतकऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतात विनापरवानगी पोल उभारून पिकांचे नुकसान होत असल्याचेही सांगितले. सर्व विद्युत रोहित्र संच व फ्युज बॉक्स दुरुस्त करणे, मोडकळीस आलेले पोल बदलणे, लोंबकळणाऱ्या तारांना उंची देणे, शेतकऱ्यांच्या लेखी परवानगी व नुकसान भरपाईशिवाय कामे न करणे, दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 09:06:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने...

