ॲड. सतीश मगरे यांचा पत्‍नीसह अपघाती मृत्‍यू; भरधाव कारने घेतला बळी, छत्रपती संभाजीनगरची घटना, जिल्हा कोर्टात करत होते वकिली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार डिव्हायडर ओलांडून स्कूटीला धडकली. यात अॅड. सतीश शाहुजी मगरे (वय ३२) व त्‍यांची पत्नी तेजल मगरे (वय ३०, मूळचे रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (७ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंबेवाडी फाट्याजवळ (ता. पैठण) घडली. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार डिव्हायडर ओलांडून स्कूटीला धडकली. यात अॅड. सतीश शाहुजी मगरे (वय ३२) व त्‍यांची पत्नी तेजल मगरे (वय ३०, मूळचे रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (७ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंबेवाडी फाट्याजवळ (ता. पैठण) घडली.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा न्यायालयात ॲड. सतीश मगरे ज्युनियर वकील होते. ते स्‍कुटीने रविवारी अंबड येथे टिळ्याच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम उरकून घरी छत्रपती संभाजीनगरला परतत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्‍यांना उडवले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीवर जाऊन धडकली. यात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software