३ दुर्दैवी घटना : फुलंब्री तालुक्‍यात पोहताना बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, खुलताबाद तालुक्‍यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत अन्‌ छ. संभाजीनगरच्या चेलीपुऱ्यात ४४ वर्षीय व्यक्‍तीची आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर/फुलंब्री/खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने )  : नाला बंडिंगमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पोखरी (ता. फुलंब्री) शिवारात गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. चरण जादूसिंग जराड (वय २५, रा. कारोळा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

चरण हा दोन मित्रांसोबत पोखरी शिवारात आला होता. तेथील नाला बंडिंगमध्ये साचलेल्या पाण्यात तिघेही पोहण्यासाठी उतरले. चरणला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. तो बुडाला. त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र वेळेत मदत मिळाली नाही. चिकलठाणा येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. त्यांनी चरणला बाहेर काढले. नंतर चरणला घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद फुलंब्री पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हरिश्चंद्र नरके करत आहेत.

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत
खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील २२ वर्षीय विकास पुंडलिक दांगोडे दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. गावातील विहिरीत गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) दुपारी त्याचा मृतदेह आढळला आहे. विकासच्या भावाने खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. गुरुवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विकासच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ आहे. घटनेचा अधिक तपास बाजार सावंगी पोलीस चौकीचे पोलीस करत आहेत.

चेलीपुऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुऱ्यात मोहम्मद अवाद मोहम्मदी (वय ४४, रा. नाहिदनगर, कटकटगेट परिसर, छ. संभाजीनगर) यांनी राहत्‍या घरात खिडकीला दोरी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) दुपारी समोर आली. अधिक तपास सिटी चौक पोलिस तपास करत आहेत. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले... छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इराण-इस्त्रायल युद्धामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. गॅसअभावी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक कंपन्या...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software