- News
- जिल्हा न्यूज
- वैजापुरातील महिलेची आत्महत्या तरुणाच्या त्रासामुळे!, पैठणमध्ये युवक, युवतीचे मृतदेह आढळले!!
वैजापुरातील महिलेची आत्महत्या तरुणाच्या त्रासामुळे!, पैठणमध्ये युवक, युवतीचे मृतदेह आढळले!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील दत्तनगर येथील ४५ वर्षीय महिलेने ११ जानेवारीला सायंकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे आता समोर आले आहे. वैजापूर पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शोभा विश्वनाथ ठोकळ (वय ४५, रा. दत्तवाडी, वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राहुल अंबादास गजबे (रा. […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील दत्तनगर येथील ४५ वर्षीय महिलेने ११ जानेवारीला सायंकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे आता समोर आले आहे. वैजापूर पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पैठण शहरातील इंदिरानगर येथील विक्रम भानुदास पोटफोडे (३७ रा. इंदीरानगर पैठण) यांचा मृतदेह बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी दीडच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत पैठण तालुक्यातील बालानगर येथे रुणीदेवी रमणी सहानी (वय ३२) ही मूळची बिहारची महिला बुधवारी दुपारी एकला बेशुद्धावस्थेत आढळली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी घेतली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Mar 2026 10:44:18
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...

