लाडसावंगी गावावर विमानाच्या ८-१० घिरट्या, कुतूहल झालं, अख्खं गाव घरातून बाहेर आलं… CSCN ने खुलासा केल्यावर सर्वांचा जीव भांड्यात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील लाडसावंगी गावावर सोमवारी (३० सप्‍टेंबर) सकाळी एक विमान घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थांचे कुतूहल जागे झाले. विमानाला झालंय काय, अशी चर्चा रंगली… दिवसभर याचा खुलासा झाला नाही, आम्‍ही करत आहोत खुलासा. झालं काय, की सकाळच्या वेळेतील इंडिगोचे मुंबईला जाणारे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्‍याचवेळी एअर इंडियाचे दिल्लीहून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील लाडसावंगी गावावर सोमवारी (३० सप्‍टेंबर) सकाळी एक विमान घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थांचे कुतूहल जागे झाले. विमानाला झालंय काय, अशी चर्चा रंगली… दिवसभर याचा खुलासा झाला नाही, आम्‍ही करत आहोत खुलासा. झालं काय, की सकाळच्या वेळेतील इंडिगोचे मुंबईला जाणारे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्‍याचवेळी एअर इंडियाचे दिल्लीहून आलेले विमानही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. इंडिगोचे विमान उड्डाण करेपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने लाडसावंगीकरांची करमणूक केली… असे अनेकदा घडते, उतरायला संधी नसेल तर विमानाला आकाशात घिरट्या घालाव्या लागतात…

सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्‍यान हा प्रकार घडला. एकाच विमानाने लाडसावंगी गावावर आठ ते दहा घिरट्या घातल्याने गावकरी चकीत झाले. रोज सकाळी, दुपारी व सायंकाळी या तीन वेळांत चिकलठाणा विमानतळावर उतरणारे विमान लाडसावंगी गावावरून जाते. सोमवारी सकाळी ते लाडसावंगी परिसरात गोल-गोल फिरू लागल्याने ग्रामस्थांत चर्चेत डुंबले. जिल्ह्यात सध्या रात्री-अपरात्री ड्रोन फिरत असल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे, त्‍यात विमानही घिरट्या घालू लागल्याने गावकरी हैराण झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर...
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई : आ. विलास भुमरेंसोबत चिमुकल्याला मतदान कक्षात प्रवेश दिल्याने ३ कर्मचारी निलंबित!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software