- News
- जिल्हा न्यूज
- नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये भरला वारकऱ्यांचा मेळा!; ६२७ दिंड्या दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत...
नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये भरला वारकऱ्यांचा मेळा!; ६२७ दिंड्या दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. आ. विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार दत्ता भारस्कर उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी आलेल्या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या भेटी घेऊन विचारपूस केली. आज, २० मार्चला सकाळी सात वाजता […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. आ. विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार दत्ता भारस्कर उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी आलेल्या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या भेटी घेऊन विचारपूस केली. आज, २० मार्चला सकाळी सात वाजता ही पूजा करण्यात आली.


नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये स्वच्छता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून दिंडी रवाना करण्यात आली. पैठण पंचायत समितीच्या आवारातून दिंडी काढण्यात आली. तहसीलदार दत्ता भारस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र देसले, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद, माहिती व संवाद तज्ञ डॉ. संजय वाघ आदी उपस्थित होते. पैठण शहरातील प्रमुख मार्गांवरून ही दिंडी नेऊन त्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.


आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

