‘ज्ञानराधा’च्या ठेवीदारांवर सुरक्षारक्षकाचा गोळीबार; एक ठेवीदार जखमी, ढोरेगावच्या तिरुमला कंपनीसमोर घडली घटना

On

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर मार्गावर असलेल्या ढोरेगाव (ता. गंगापूर) शिवारातील तिरुमाला कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने वैजापूर तालुक्यातील ज्ञानराधा पतसंस्थेच्या खातेधारकांवर छर्ऱ्याच्या रायफलमधून (डबल बोर) गोळीबार केला. यात डोक्याला छर्रे लागून एक खातेदार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (१६ सप्टेंबर) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. तिरुमाला कंपनी सुरू आहे की बंद हे पाहण्यासाठी […]

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर मार्गावर असलेल्या ढोरेगाव (ता. गंगापूर) शिवारातील तिरुमाला कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने वैजापूर तालुक्यातील ज्ञानराधा पतसंस्थेच्या खातेधारकांवर छर्ऱ्याच्या रायफलमधून (डबल बोर) गोळीबार केला. यात डोक्याला छर्रे लागून एक खातेदार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (१६ सप्टेंबर) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

तिरुमाला कंपनी सुरू आहे की बंद हे पाहण्यासाठी खातेदार आले होते. वैजापूर तालुक्यातील शेकडो खातेधारकांनी सुरेश कुटे याच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या वैजापूर शाखेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, मल्टिस्टेट बंद पडल्याने या ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यापैकी पाच ठेवीदार सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कुटेची तिरुमला कंपनी सुरू आहे की नाही, हे पाहायला आले होते. आम्हाला कंपनीत प्रवेश द्या, अशी मागणी ते सुरक्षारक्षकाकडे करत होते. तिथे कंपनीद्वारे नियुक्त शौर्य एजन्सीच्या योगेश बबन तनकुरे (डबल बोर परवानाधारक सेवानिवृत्त सैनिक, वय ४०, रा. आखेगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध केला.

ठेवीदार आणि त्याच्यात वाद होऊन ठेवीदार कंपनीत घुसत असताना तनकुरे याने त्याच्याजवळील छर्रा बंदुकीने गोळीबार केला. त्यात शिवनाथ देविदास आहेर (वय ३३, रा.नगिना पिंपळगाव, ता. वैजापूर) याच्या डोक्याला व हाताला छर्रा चाटून गेला. तो जखमी झाला. त्याच्यासोबतच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत गंगापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमी शिवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा सुरक्षा रक्षक योगेश बबन तनकुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सुरक्षा रक्षक तनकुरे यानेही राहुल अशोक देवरे (वय ३१, रा. लक्ष्मीनारायणनगर, वैजापूर), पुष्पेंद्र कृष्णदास बापते (४३, नवजीवन कॉलनी, वैजापूर), ज्ञानेश्वर श्रीराम गायके (३२, रा. भिवगाव, ता. वैजापूर), योगेश सुभाष गायकवाड (३५, रा. गायकवाडवाडी, वैजापूर) यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व खासगी मालमत्तेत जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला, म्हणून फिर्याद दिली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software