घाटीत आता कांगारू मदर केअर सेंटर; स्टरलाइट टेक्नॉलॉजी कंपनीने केले सहकार्य

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयात मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसोबत आईवरही कांगारू मदर केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहे. गुरुवारी (१ ऑगस्ट) या विभागाचे लोकार्पण करण्यात आले. घाटी रुग्णालयात दिवसाला जवळपास ६० महिलांची प्रसूती होते. काही वैद्यकीय कारणांमुळे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच किमान १५ मातांची प्रसुती होते. अशा नवजात शिशुंवर प्रकृती स्थिर होईपर्यंत सीआयसीयूमध्ये किंवा आईच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयात मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसोबत आईवरही कांगारू मदर केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहे. गुरुवारी (१ ऑगस्ट) या विभागाचे लोकार्पण करण्यात आले.

घाटी रुग्णालयात दिवसाला जवळपास ६० महिलांची प्रसूती होते. काही वैद्यकीय कारणांमुळे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच किमान १५ मातांची प्रसुती होते. अशा नवजात शिशुंवर प्रकृती स्थिर होईपर्यंत सीआयसीयूमध्ये किंवा आईच्या कुशीत ठेवण्यात प्राधान्य दिले जाते. घाटीत अशा बाळांसाठी विशेष सुविधा नव्हती. अनेकदा अतिदक्षता विभागात ठेवण्यात येत होते. त्यामुळे आई व बाळाची ताटातूट होत होती.

आईच्या स्पर्शातून मिळणाऱ्या मायेपासून नवजात शिशू वंचित राहत होते. आता घाटी रुग्णालयात यासाठी ३० खाटांचे स्वतंत्र कांगारू मदर केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने दीड कोटीतून हे केंद्र साकारण्यात आले आहे. यासाठी नवजात शिशूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख, सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल जोशी यांनी प्रयत्न केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software