अल्पवयीन मुलीवर बलात्‍काराचा व्हिडीओ बनवून वारंवार जबरदस्ती; छत्रपती संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार करताना त्‍याचा व्हिडीओ बनवला. नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत होता. मुलीने धाडस करून पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल शांताराम धनेधर (रा. ताजनापूर सावंगी. ता. खुलताबाद) असे संशयित तरुणाचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार करताना त्‍याचा व्हिडीओ बनवला. नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत होता. मुलीने धाडस करून पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राहुल शांताराम धनेधर (रा. ताजनापूर सावंगी. ता. खुलताबाद) असे संशयित तरुणाचे नाव असून, ही घटना धामणगाव, (ता. खुलताबाद) येथे ६ सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२४ या कालावधीत घडल्याचे मुलीने तक्रारीत म्‍हटले आहे. ती घरात एकटी असताना राहुल घरात घुसला. मुलीला तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्‍याने बलात्‍कार केला. त्‍याचा व्हिडीओ तयार करून नंतर तो या व्हिडीओच्या आधारे तिच्यावर बलात्‍कार करत होता. ६ सप्टेंबर २०२३ पासून २८ जून २०२४ पर्यंत हा प्रकार सुरू होता. जूनमध्ये त्‍याने व्हिडीओ काही व्यक्‍तींना पाठवल्यानंतर मुलीने कुटुंबीयांना सर्वप्रकार सांगितली. त्‍यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिक्षक श्री. गिरी अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software