अभयच्या मृत्‍यूचे गूढ उकलले!; १४ वर्षीय मुलीला बोलत असल्याच्या संशयावरून धमक्या आल्या… त्याने घाबरून टोकाचे पाऊल उचलले!!; नक्की काय घडलं वाचा… खुलताबाद तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) २० वर्षीय अभय कैलास सोळसे याच्या आत्‍महत्‍येचे गूढ उकलले आहे. त्याच्या मामाने खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी जिजाबाई तेजराव भालेराव (रा. सेलूद, ता. छत्रपती संभाजीनगर) व करण विष्णू घोरपडे (रा. कचनेर, ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १४ वर्षीय नातीला अभय बोलत असल्याचा संशय जिजाबाईला होता. त्‍यातूनच […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) २० वर्षीय अभय कैलास सोळसे याच्या आत्‍महत्‍येचे गूढ उकलले आहे. त्याच्या मामाने खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी जिजाबाई तेजराव भालेराव (रा. सेलूद, ता. छत्रपती संभाजीनगर) व करण विष्णू घोरपडे (रा. कचनेर, ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १४ वर्षीय नातीला अभय बोलत असल्याचा संशय जिजाबाईला होता. त्‍यातूनच जिजाबाई व जिजाबाईचा नातू करण हे दोघे अभयला कॉल करून पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होते. मारण्याच्या धमक्या देत होते. घाबरलेल्या अभयने राहत्‍या घरात रुमालाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

प्रविण प्रकाश गायकवाड (वय ३४, रा. बाजारसावंगी ता. खुलताबाद) यांनी तक्रारीत म्हटले आहे, की भाचा अभय कैलास सोळसे याचे आई- वडील तो लहान असतानाच वारलेले होते. अभय कपड्यांच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करायचा. १५ जून २०२४ रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अभयने घरातील पत्राच्या ॲन्गलला पांढऱ्या रुमालाने फाशी घेतली. प्रवीण गायकवाड यांनी गावातील लोकांच्या मदतीने अभयला तातडीने बाजारसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

प्रवीण गायकवाड यांनी अभयचा मोबाइल तपासला असता त्‍यावर १५ जूनला दुपारी पावणेपाचच्या सुमारास करण विष्णू घोरपडे याचा कॉल आलेला दिसला. त्या कॉलची रेकॉर्डिंग होती. ती ऐकली असता जिजाबाई भालेराव व तिचा नातू करण घोरपडे हे तू आमच्या मुलीला फोन का लावला. तुझ्यावर आम्ही आता पोलीस केस करतो, असे म्हणून शिवीगाळ करत होते व मारण्याच्या धमक्या देत होते. अभय त्यांना माझी चूक झाली. मला माफ करा, अशा विनवण्या करत होता. मात्र ते त्याचे काहीएक ऐकून न घेता शिवीगाळ करत होते व पोलीस केस करण्याच्या धमक्या देत होते. जिजाबाईला तिच्या १४ वर्षीय नातीशी अभय बोलत असल्याचा संशय होता. त्‍यांच्या धमक्यामुळे घाबरून अभयने आत्‍महत्‍या केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software