काय सांगता... नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून छत्रपती संभाजीनगरकरांच्या नळाला रोज येणार पाणी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : हजारो रुपयांचा कर भरूनही ‘पाणी पाणी' करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरकरांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज मिळणार आहे. शहरवासीयांचे नवीन वर्ष ‘पाणीदार' राहण्याचे संकेत मिळाले असून, एक जानेवारीपासून शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्याची जय्यत तयारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराला ३१ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यादृष्टीने जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तयारीही सुरू केली. शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर जीवन प्राधिकरणने ऑक्टोबरअखेरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे न्यायालयाला सांगितले होते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे मजीप्रा आणि पाईपलाईनचे काम करणारे कंत्राटदार यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर जायकवाडी आणि पैठण रोडवरील जलवाहिनीचे कामही तीन आठवडे बंद ठेवावे लागले. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पाणी उपसा केंद्रावर अंतिम स्लॅब टाकण्यात आला. तेथे चार हजार हॉर्सपॉवरची मोटरही बसविण्यात आली. आता विद्युत मोटार आणि शेड उभारण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी मुख्य जलवाहिनी जोडणीचे कामही सुरू झाले आहे.

यानंतर आता १५ डिसेंबरपासून जायकवाडीतून पाण्याचा उपसा करून नक्षत्रवाडी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रात त्याची चाचणी केली जाईल. यानंतर पुढील १५ दिवसांत म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून शहरवासीयांच्या नळाला दररोज पाणी दिले जाईल. अर्थात नियोजित तारीख दोन- चार दिवस मागेपुढे झाली तरी कोणत्याही परिस्थितीत नवीन वर्षात शहरवासीयांना दररोज पाणी देण्याचा ठाम निर्धार ‘मजीप्रा'ने केला आहे. दरम्यान, जायकवाडीपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची जोडणी, पाणी उपसा केंद्राच्या ठिकाणची विद्युत पुरवठ्याची कामे व व अन्य किरकोळ कामे करण्यासाठी पुढील दीड ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘मजीप्रा'ने ठेवले असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software