जानेवारीअखेरपर्यंत पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ; विद्यापीठाचा निर्णय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रावरील दंड व विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.बी एन डोळे यांनी दिली.

सन डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची नवीन मतदान नोंदणी सध्या सुरू असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप व सहकारी यांनी पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ करण्याची मागणी केली. या बैठकीत हा ठराव मान्य करण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात गेल्या व १९९४ पूर्वी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विद्यापीठातून आतापर्यंत पदवी न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी विनाविलंब शुल्क प्राप्त करता येणार आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी, एमफील व पीएच.डी. प्रमाणपत्रासाठी याचा फायदा होणार आहे.१० नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कार्यकाळात दंड माफ मोहीम लागू असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले पदवी प्रमाणपत्र प्राप्त करावी, असे आवाहन डॉ. डोळे यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software