विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवाचा उद्यापासून जल्लोष; अभिनेत्री वनिता खरात, वैभव मांगले यांची उपस्थिती, २६२ संघ, १ हजार कलावंतांचा सहभाग

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. महोत्सवात चार जिल्ह्यांतून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

या संदर्भात माहिती देण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळाच्या बैठक कक्षात गुरुवारी (२५ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी संचालक डॉ. कैलास अंभुरे, प्रसिध्दी समिती अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती. महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते शनिवारी (२७ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होईल. कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या वेळी विभागाचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल अतिथी म्हणून उपस्थित राहील.

कार्यक्रमास प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, अ‍ॅड. दत्तात्रय भांगे, संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोप व बक्षीस वितरण सभारंभही याच ठिकाणी होणार असून प्रख्यात अभिनेते वैभव मांगले, माजी विद्यार्थी तथा कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. व्यंकटेश लांब यांचीही उपस्थिती राहणार आहे. महोत्सवाच्या तयारीसाठी २५ समित्या स्थापन करण्यात आल्या असून जवळपास दीडशे सदस्य, सल्लागार व संयोजन समिती सदस्य यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

२६२ संघ, १ हजार कलावंत
महोत्सवात जिल्हानिहाय विजेते संघ तसेच ललित कला गटातील सर्व असे २६२ संघ सहभागी होणार आहेत. यापूर्वी ७ ते २० सप्टेंबर या काळात चार जिल्हा महोत्सव घेण्यात आले. केंद्रीय युवक महोत्सवात या संघातील विजेते एकूण १ हजार २१ कलावंत सहभागी होणार, असून ५२७ मुली व ४९४ मुले आहेत. जिल्हानिहाय संघ व कलावंत असे :
धाराशिव - ३४ संघ, १६३ कलावंत
बीड - ५५ संघ, २३६ कलावंत
जालना - ५८ संघ, २०८ कलावंत
छत्रपती संभाजीनगर - ११५ संघ, ४१४ कलावंत
याप्रमाणे एकूण १०२१ कलावंत सहभागी होणार आहेत.

पाच गटांत २८ कलाप्रकार
महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य आणि ललित कला अशा पाच गटांत २८ कलाप्रकार सादर होणार आहेत. शोभायात्रा हा स्वतंत्र कलाप्रकारही असणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software