OBC विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी छत्रपती संभाजीनगरात २ वसतिगृहे सज्‍ज!, मंत्री अतुल सावेंच्या हस्ते थाटात उद्‌घाटन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यात ७२ वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी येथे केले. श्री. सावे यांच्या हस्ते शुक्रवारी (१७ ऑगस्ट) इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यात ७२ वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी येथे केले.

श्री. सावे यांच्या हस्ते शुक्रवारी (१७ ऑगस्ट) इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या वसतिगृहाचे वेदांतनगर येथे उद्‌घाटन करण्यात आले. जलील शेख, पी. जी. वाबळे, चंद्रकांत हिवराळे, नरेंद्र तिवारी, लक्ष्मण हिवराळे यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. ग्रामीण भागातील मुला, मुलींची शहरात शिक्षण घेत असताना राहण्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील ३६ जिल्ह्यांत प्रत्येकी २ असे ७२ वसतिगृह तयार करण्यात येत आहे.

यात १०० मुले आणि १०० मुली यांच्या निवासाची क्षमता आहे. सर्व सुविधा या वसतिगृहात आहेत. वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, विविध भत्ते, ग्रंथालय अशा विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या वसतिगृहात ज्यास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. ज्यांना प्रवेश मिळणार नाही अशांना सावित्रीबाई फुले आधार योजना आणि स्वयंम योजने च्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे, असेही सावे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software