फुप्फुस मुंबईला, यकृत अन्‌ किडनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्यारोपित, ब्रेनडेड रुग्णामुळे ३ जणांना जीवनदान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ब्रेनडेड झालेल्या ६६ वर्षीय वृद्धाचे त्यांचे पूत्र, मुलगी, जावई यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. लगेचच फुप्फुस हे विमानाने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलला, यकृत छत्रपती संभाजीनगरातीलच कमलनयन बजाज हॉस्पिटल, तर एक किडनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित करण्यात आली. यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. नेत्रदानही झाले. हृदय आणि दुसरी किडनी मात्र प्रत्यारोपणासाठी योग्य नव्हती. अभिमान नागरगोजे (वय ६६, रा. देवगाव, ता. केज, जि. बीड) या वृद्धामुळे एकाचवेळी तीन रुग्णांना जीवनदान आणि दृष्टी मिळाली.

नागरगोजे यांना छातीत दुखत असल्याने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ते ब्रेनडेड झाल्याचे लक्षात आल्यानंतर पूत्र रामहरी नागरगोजे, जावई शरद मुंडे, मुलगी मीरा मुंडे यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच यंत्रणा हलली. ग्रीन कॉरिडोर करून नागरगोजे यांना छत्रपती संभाजीनगरला सिग्मा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. बुधवारी (२९ सप्टेंबर) लगेचच अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी फुप्फुस घेऊन पहिली रुग्णवाहिका मुंबईला रवाना झाली. अवघ्या ७ मिनिटांत फुफ्‍फुस विमानतळावर पोहोचले, तर यकृत अवघ्या साडेतीन मिनिटांत पोहोचविण्यात आले. अवयवाच्या पेटीवर फुलांचा वर्षाव करताना कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते . मराठवाड्यातील ४३ वे अवयवदान ठरले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software