माजी नगरसेवक कुलकर्णींना मारहाण गैरसमजुतीतून, रिक्षाचालकाचा जबाब, सुतगिरणी चौकातील घटनेवर ‘पडदा’‌!‌

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासोबत घडलेला मारहाणीचा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचा जबाब रिक्षाचालकाने देत, अपघात मात्र कारचालकाच्या चुकीमुळे झाल्याचा दावा केला. या प्रकरणात रिक्षाचालकाविरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी गुरुवारी (१८ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

सलमान हसन मन्सुरी (वय ३१) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याचा मामा शब्बीर कासम पिंजारी (वय ५५, दोघे रा. काबरा नगर) यांची रिक्षा सलमान चालवतो. बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री १०:३० वाजता सलमान रिक्षात प्रवासी घेऊन शिवाजीनगरहून शहानुरमियाँ दर्गाकडे जात होता. सूतगिरणी चौकाच्या पुढे गादिया विहारजवळ सुसाट कारने रिक्षाला धडक दिली. रिक्षा उलटून सलमान आणि प्रवाशी आत अडकले. त्याचवेळी तिथून सुरेंद्र कुलकर्णी जात होते. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

अपघाताची माहिती सलमानचा मामेभाऊ अमजत शब्बीर पिंजारीला कळताच तो तिथे आला आणि त्याने अपघात कुलकर्णी यांच्यामुळेच घडल्याची समजूत करून घेत त्यांच्यावर हल्ला केला. तोपर्यंत कारचालक मात्र पसार झाला होता. त्यामुळे संतप्त जमावाने अमजतला बेदम चोप दिला. पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन अमजतची जमावाच्या तावडीतून सुटका करत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर रिक्षाचालक सलमानने कुलकर्णींना मारहाण गैरसमजातून झाल्याचे लिहून देत कारचालकामुळे अपघात झाल्याचे सांगितले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software