ट्युशनला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण, सिडकोतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ट्युशनला गेलेला १४ वर्षीय मुलगा घरी परतलाच नाही. त्‍याच्या वडिलांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात केली आहे. ही घटना शनिवारी (२१ सप्‍टेंबर) दुपारी सिडकोतील आविष्कार कॉलनीत घडली.

तक्रारीनुसार, कैलास पलमटे (वय ५५) एमजीएम रुग्णालयातील ग्रंथालयात शिपाई आहेत. ते पत्‍नी, मुलगी व मुलासह राहतात. त्यांचा मुलगा ज्ञानोबा नववीत शिकतो. तो ट्यूशनला जातो, असे सांगून शनिवारी दुपारी अडीचला घरातून बाहेर पडला. तो सिडको एन ७ येथील क्‍लासेसमध्ये जातो. तो सायंकाळी परत आला नाही. वडिलांनी क्लासला जाऊन चौकशी केली. तेव्हा तो क्लासलाच आला नसल्याचे कळले. मित्र, नातेवाइकांकडे शोधूनही तो मिळून आला नाही.

कैलास पलमटे यांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तपास सहायक फौजदार येडूबा तेलुरे करत आहेत. पोलिसांनी चिश्तिया चौक ते सिडको भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. मात्र उपयोग झाला नाही. मुलाविषयी माहिती मिळाल्यास सिडको पोलीस ठाण्याला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुलाचे वर्णन : सावळा रंग, चेहरा गोल, शरीरबांधा जाड, उंची ४ फूट, अंगात आकाशी हाफबाह्यांचा टीशर्ट, मिलिट्री रंगाची पँट, पायात चप्पल, गळ्यात तुळशीमाळ, सोबत स्कूलबॅग.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software