छत्रपती संभाजीनगर शहरात पावसाचे तांडव : सातारा ते पडेगाव ढगफुटी!; शहरवासियांची दाणादाण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शुक्रवारी (१९ सप्‍टेंबर) सायंकाळी सहानंतर छत्रपती संभाजीनगरात पावसाने तांडव केले. सलग दोन तास सुसाट वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरवासियांची दाणादाण उडाली. अवघ्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. सखल भागातील ५० हून अधिक वसाहतींमध्ये घरे, दुकानांत पाणी शिरले. पडेगावमध्ये तर अक्षशः ढगफुटी झाली. पावसामुळे रस्‍त्‍यावरचे काहीच दिसेनासे झाल्याने वाहतूकही ठप्प झाली. एमजीएम वेधशाळेच्या नोंदीनुसार, पडेगावमध्ये १०५ मि. मी. पाऊस झाला असून, चिकलठाण्यात १६.६ मि.मी., एमजीएम परिसरात २४.१ व गांधेलीत २.४ मि. मी. पाऊस झाला आहे.

वीज पुरवठा ठप्प
पडेगाव ते सातारा या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अवघ्या शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पिसादेवीपासून तर साताऱ्यापर्यंत आणि चिकलठाण्यापासून तर पडेगावपर्यंत शहर अंधारात बुडाले. रात्री ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. तोपर्यंत महावितरणच्या नियंत्रण कक्ष, हेल्पलाइनवरून नागरिकांना प्रतिसाद मिळालाच नाही. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस होता. गारखेडा परिसर, बीड बायपास, सातारा देवळाई, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा, सिडको, हडको, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, शिवाजीनगर, उस्मानपुरा, ज्योतीनगर, जुन्या शहरातही वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक भागांत ४ ते ५ तास वीज गायब होती.

या भागांत साचले पाणी
शिवाजीनगर भुयारी मार्ग, देवळाई चौक, चेतक घोडा, प्रतापनगर, दर्गा चौकासह उड्डाणपुलाखाली, त्रिमूर्ती चौक, जयभवानी चौक, पुंडलिकनगर, सिडको उड्डाणपूल, अदालत रोड, महावीर चौक ते छावणी उड्डाणपूल, जाधववाडी, हर्सूल परिसर, टीव्ही सेंटर, आझाद चौक, सिटी चौक, एमजीएम परिसर, पडेगावमधील सखल भागांत दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले.

अनेकांच्या घरांत पाणी...
जिल्हा क्षयरोग कार्यालय, भावसिंगपुरा, अमीन चौक परिसर, रेल्वे गेट एमआयटी परिसरातील कमल सोसायटी, कोकणवाडीतील भगीरथ कॉलनी, क्रांतीनगरातील तन्मय फिटनेस क्लबमध्ये, विजयनगर गारखेडा परिसर, इंदिरानगरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले. त्‍यांचे कॉल अग्निशमन दलाकडे आल्याचे सांगण्यात आले. जवानांनी तिथे धाव घेऊन पंपाने पाणी उपसले.

विमानाला उशीर
पावसामुळे मुंबईहून रात्री ८:२५ वाजेच्या सुमारास शहरात येणाऱ्या विमानाला जवळपास अर्धा तास विलंब झाला. सकाळच्या सत्रातही इंडिगोचे मुंबई- छत्रपती संभाजीनगर विमान धुक्याच्या परिस्थितीमुळे धावपट्टीवर उतरले नाही. पायलटने विमान नागपूरला वळविण्याचा निर्णय घेतला. नागपूरहून सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे विमान पुन्हा शहरात आले. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software