मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच राहणार, सुप्रिम कोर्टाचा निर्णय, ‘औरंगाबाद’ प्रेमींना मोठी चपराक, धाराशिवही कायम

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : तमाम छत्रपती नगरवासियांसाठी अत्‍यंत आनंदाची बाब आहे. राज्‍य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केल्‍यानंतर पोटशूळ उठलेल्‍या काहींनी आधी मुंबई उच्‍च न्‍यायालय आणि नंतर दिल्‍लीत सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. शहराच्‍या नामांतराविरुद्ध दाखल ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, २ ऑगस्‍टला फेटाळल्‍याने छत्रपती संभाजीनगरचे विरोधक तोंडावर आपटले आहेत. राज्यांना नाव बदलण्याचा अधिकार असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : तमाम छत्रपती नगरवासियांसाठी अत्‍यंत आनंदाची बाब आहे. राज्‍य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केल्‍यानंतर पोटशूळ उठलेल्‍या काहींनी आधी मुंबई उच्‍च न्‍यायालय आणि नंतर दिल्‍लीत सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. शहराच्‍या नामांतराविरुद्ध दाखल ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, २ ऑगस्‍टला फेटाळल्‍याने छत्रपती संभाजीनगरचे विरोधक तोंडावर आपटले आहेत. राज्यांना नाव बदलण्याचा अधिकार असून, यात न्यायालय कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे स्‍पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. हृषिकेश रॉय आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्‍या खंडपीठाने सांगितले. याच निर्णयात धाराशिवचेही नाव कायम राहणार असल्‍याचे सांगण्यात आले.

तत्‍कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले होते. त्‍यानंतर आलेल्‍या महायुती सरकारने संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करून तशी अधिसूचनाही काढली. उस्‍मानाबादचेही नाव धाराशिव केले. राज्‍य सरकारच्‍या या निर्णयाविरोधात औरंगजेबप्रेमी न्‍यायालयात गेले होते. उच्‍च न्‍यायालयात तोंडावर आपटूनही त्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. अखेर तिथेही त्‍यांचे मनुसबे यशस्वी झाले नाहीत. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगरचे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय कायम ठेवल्‍याने आनंदाचे वातावरण आहे.

आदेशात काय म्‍हटलंय…
राज्याला नाव देण्याचा अधिकार असेल तर ते नाव बदलण्याचाही अधिकार आहे. राज्याने दोन शहरांची नावे बदलण्यापूर्वी कायद्यानुसार घालून दिलेल्या प्रक्रियेचे व्यापकपणे पालन केलेले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...