- News
- सिटी डायरी
- कर्णपुरा यात्रेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण, उद्यापासून यात्रा
कर्णपुरा यात्रेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण, उद्यापासून यात्रा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उद्या, ३ ऑक्टोबरपासून शहरातील कर्णपुरा यात्रेची सुरुवात होत आहे. ही यात्रा शांतता व सुरक्षित वातावारणात पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी झाली असून, स्वच्छता, सुरक्षितता व आरोग्यपूर्ण वातावरणात यात्रेचा आनंद घ्यावा. जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना दिली आहे. यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उद्या, ३ ऑक्टोबरपासून शहरातील कर्णपुरा यात्रेची सुरुवात होत आहे. ही यात्रा शांतता व सुरक्षित वातावारणात पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी झाली असून, स्वच्छता, सुरक्षितता व आरोग्यपूर्ण वातावरणात यात्रेचा आनंद घ्यावा. जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना दिली आहे.
खाद्यपदार्थ तपासणार, प्लास्टिक पिशवीला बंदी…
यात्रेत स्टॉलवरील खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होणार असून, प्लाास्टिक पिशवी बंदी असणार आहे. आकाश पाळणा, मौत का कुआँ यांची तपासणी होणार आहे. यात्रा महोत्सवात अव्याहतपणे विद्युतपुरवठा राहणार आहे. यात्रा सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागाने योग्य समन्वय ठेवून खबरदारी घ्यावी, असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले.

