रस्ता ओलांडताना सुसाट दुचाकीने उडवले, खासगी वाहनचालक जखमी, बन्सीलालनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सुसाट दुचाकीस्वाराने उडवल्याने खासगी वाहनचालक जखमी झाल्याची घटना १८ ऑक्‍टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाबासाहेब लक्ष्मण जाधव (वय ४६, रा. गल्ली नं. ३, नागसेनगर उस्मानपुरा) हे दीपक कोठारी यांच्या कारवर चालक आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितले, की दीपक कोठारी यांनी मिठाई आणायला सांगितल्याने बन्सीलालनगरातील बिकानेर मिठाई दुकानात जाण्यासाठी ते निघाले. रस्ता ओलांडत असताना अचानक मोटारसायकल (MH20 HK 0868) चालकाने भरधाव येऊन धडक दिली. त्यामुळे जाधव यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. मोटारसायकलचालक न थांबता पळून गेला. जमलेल्या लोकांनी पटवर्धन हॉस्पिटलमध्ये जाधव यांना दाखल केले. तिथून त्यांना ओरियन सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार घे१न बरे झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार वर्षा मुंढे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software