ब्रेकअप केलेली गर्लफ्रेंड फोटो घेऊन त्‍याच्या होणाऱ्या पत्‍नीच्या घरी धडकली!; चाऊस कॉलनीत काय राडा झाला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एक्स गर्लफ्रेंडला जेव्हा कळलं, की त्याचं लग्न ठरलं आहे, त्यावेळी संतापाने लालबूंद होत तिने त्याच्या भावी पत्‍नीचे घर गाठले आणि त्‍यांना दोघांचे फोटो दाखवले. हे त्याला कळताच तोही तिथे आई, बहिणीसह येऊन धडकला. तो, त्‍याची भावी पत्‍नी, आई, बहिणीने मिळून ‘एक्स’ला बेदम मारहाण केली. यात ती जखमी झाली आहे. ही घटना हिमायतनगरातील चाऊस कॉलनीत शनिवारी (४ ऑक्‍टोबर) दुपारी चारला घडली.

३० वर्षीय आलिया (नाव बदलले आहे) मुकुंदवाडीत राहते. ती शाहरुखसोबत (नाव बदलले आहे) ३ वर्षे प्रेमसंबंधात होती. आलियाने त्याला लग्नाबद्दल विचारले असता त्याने नकार दिला होता. त्यामुळे तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून दोघे झाले आहेत. शाहरुखसोबत अलिशासोबत (नाव बदलले आहे) लग्न करत असल्याचे आलियाला कळले. त्यामुळे ती त्याचे बिंग फोडायला दोघांचे फोटो घेऊन थेट अलिशाच्या घरी चाऊस कॉलनी, हिमायतनगर येथे शनिवारी (४ ऑक्‍टोबर) दुपारी चारला गेली. त्यावेळी अलिशा घरी नव्हती. तिची आई होती.

आलिया त्यांना बोलायला सरसावली असता, त्यांनी तिला बाहेरच थांबवले. त्यानंतर अलिशाचे वडील बाहेर आले. आलियाने त्यांना शाहरुखसोबतचे फोटो व गुन्हा दाखल केल्याची कागदपत्रे दाखवली. ते दाखवत असतानाच शाहरुख, त्याची आई -बहीण व अलिशा तिथे आले. त्यांनी आलियाला शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. शाहरुखने लाकडी दांड्याने तिच्या उजव्या हातावर व पायावर मारून जखमी केले. तू येथे का आली, असे म्हणून तुला आता जीवे मारून टाकतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी शाहरुख, त्याची आई व बहीण (सर्व रा. समतानगर), अलिशा (रा. चाऊस कॉलनी, हिमायतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी वाडेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software